क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी, थेट पाकिस्तानशी कनेक्शन

Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले. क्रांती रेडकरने सोशल मीडिया […]

Kranti Redkar

Kranti Redkar

Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले.

क्रांती रेडकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर धमकीचे मेसेज आणि कॉल्सची माहितीही दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत तिने लिहिले आहे की, मला अनेक पाकिस्तानी आणि ब्रिटिश क्रमांकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला ही बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. पोलिसांनाही याबाबत सातत्याने माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! वायनाडमधून राहुल गांधींचे नाव फायनल; पाहा संपूर्ण लिस्ट

दरम्यान, क्रांतीला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या वर्षी समीर आणि क्रांतीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यात आल्या होत्या. या दोघांशिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. क्रांतीने तिच्या पोस्टसोबत तीन स्क्रीनशॉट देखील जोडले आहेत, ज्यामध्ये तिला पाकिस्तानी नंबरवरून संदेश आणि ब्रिटीश नंबरवरून कॉल येत असल्याचे दिसते आहे.

Exit mobile version