काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! वायनाडमधून राहुल गांधींचे नाव फायनल; पाहा संपूर्ण लिस्ट

काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! वायनाडमधून राहुल गांधींचे नाव फायनल; पाहा संपूर्ण लिस्ट

Congress Candidate List 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली होती. काँग्रेसने आज पहिली उमेदवार यादी जाहीर करून त्यास मान्यता दिली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 39 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही जागेचा समावेश करण्यात आलेला नाही.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून सात, केरळमधून 16, लक्षद्वीपमधून एक, मेघालयातून दोन, नागालँडमधून एक, सिक्कीममधून एक, तेलंगणातून चार आणि त्रिपुरातून एक अशी नावे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयमधून व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत.

आता भाजपमध्ये जायला पाहिजे का ? ईडी कारवाईनंतर रोहित पवारांचे जोरदार प्रत्त्युतर

काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.

पहिल्या यादीत आणखी कोणाला स्थान मिळाले?
काँग्रेसने पहिल्या यादीत छत्तीसगडमधून अधिक उमेदवार उभे केले आहेत. त्यात जांजगीरमधून शिव दहरिया, कोरबामधून ज्योत्स्ना महंत, दुर्गमधून राजेंद्र साहू, रायपूरमधून विकास उपाध्याय आणि महासमुंदमधून ताम्रध्वज साहू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Congress Candidate List 2024

Congress Candidate List 2024

काँग्रेसने केरळमध्ये कोणाला दिले तिकीट?
कासारगोडमधून राजमोहन उन्नीथन, कन्नूरमधून के सुधाकरन, वडकारामधून शफी पारंबिल, वायनाडमधून राहुल गांधी, कोझिकोडमधून एमके राघवन, पलक्कडमधून व्हीके श्रीकंदन, अलाथूर-एसीमधून रम्या हरिदास, त्रिसूरमधून के मुरलीधरन, चालकुड्डीमधून बेनी बेहनन, हिलाकुडी इथून एम.के. इडुक्कीमधून ईडन, इडुक्कीमधून डीन कुरियाकोसे, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, मावेलिक्करा-एसीमधून कोडिकुनिल सुरेश, पथनामथिट्टामधून अँटो अँटोनी, अटिंगलमधून अदूर प्रकाश आणि तिरुवनंतपुरममधून शशी थरूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आदित्य-तेजस त्यांना काका म्हणायचे, घरातलाच माणूस फिरला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज