मराठा समाजाकडून राणेंना काळे झेंडे! ‘समोर येऊन दाखवा ना’, राणे संतापलेच
Nilesh Rane News : अहमदनगर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nilesh Rane) हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, याबाबत राणे यांना प्रश्न केला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही. मला समोर येऊन दाखवा ना त्यांची हिंमत नाही तेवढी, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“बँडबाजा वाजलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने गडकरींना ऑफर देणे म्हणजे”.. फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
नगर जिल्ह्यातील अकोला येथे एका विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी. नगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील पोलीस परेड ग्राउंड समोर नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलन करताना ताब्यात घेतले.
नारायण राणे यांचा ताफा हा नगर पुणे रोडच्या दिशेने जात असताना शिल्पा गार्डन परिसरात पुन्हा एकदा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने नारायण राणे यांचा निषेध देखील करण्यात आला. याबाबत राणे यांना प्रश्न केला असता राणे चांगले संतापले आहेत.
दरम्यान, मला कोणी काळे झेंडे दाखवले नाही, मला कोणी काळे झेंडे दाखवताना दिसलं नाही मात्र त्यापूर्वीच तुम्ही बातम्या देखील प्रसारित केल्या. माझ्यासमोर येऊन मला दाखवा ना काळा रंग कसा असतो. मात्र त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही असे बोलतच नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला व कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.
राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांच्या सभांना आणि कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगरच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मराठा समाजाने दिला. परंतु त्यापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणे यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध केला होता. मराठा समाज हे आरक्षण स्विकारणार नाहीत. स्वाभिमानी मराठा कुणबीमधून आरक्षण घेणार नाही. असे आरक्षण घेतल्यास ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे, असे म्हटले होते. यावरुन मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राणेंनी यांनी देखील जरांगेंवर टीका केली.