नितेश राणे ‘वेडा’ आमदार, पोलिसांनी दुर्लक्ष करावं; आंबेडकरांचा राणेंवर मार्मिक भाष्य…

नितेश राणे ‘वेडा’ आमदार, पोलिसांनी दुर्लक्ष करावं; आंबेडकरांचा राणेंवर मार्मिक भाष्य…

Prakash Ambedkar On Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ‘वेडा’ आमदार असून पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, असं मार्मिक भाष्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जाहीर सभेतून आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत थेट भाष्य केलं होतं. नितेश राणेंच्या या भाष्यानंतर राज्यातील विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा सूर लावण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या बोलण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करण्याचं उपरोधिकपणे म्हटलं आहे.

“मतदानावर परिणाम होणारच, नवं चिन्ह बिंबवणं सोपं नाही”; भुजबळांनी खोडला रोहित पवारांचा दावा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपचा आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई होऊ शकते पण पोलिसांनी कारवाई न करता दुर्लक्ष करावं. एक वेडा खासदार, आमदार बोलतोयं, असं म्हणून सोडून द्यावं. प्रत्येक गोष्ट व्यक्तिमत्वावर अवलंबून असते, या गोष्टीचा काही परिणाम, असं समाजही घेत नाही पोलिसांनीही घेऊ नये, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

‘काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणारच’; महिला साथीदाराकडून पोलखोल

काय म्हणाले होते नितेश राणे?
पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आपण कार्यक्रम करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. असं म्हणत नितेश राणे यांनी हिंदू कार्यकर्त्यांना एक प्रकारे चिथावणी दिली. त्यानंतर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पुढे ते म्हणाले, माळशिरसमधून एकच फोन आला पाहिजे की, नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतो. कारण पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आम्ही हिंदू सोबत उभा राहण्यासाठी आलोय कुणाच्या वाकड्यात फिरण्यासाठी नाही, असं नितेश राणे म्हणाले होते.

मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार नितेश राणे चांगलेच चर्चेत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील हिंदु जनआक्रोश मोर्चात ते हिरीरीने सहभाग घेत आहेत. या मोर्चादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना राणे विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांनी केलेली विधाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानांनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी सडकून टीका न करता उपरोधिक टीका केल्याचं दिसून आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज