प्रशिक्षणार्थी IPS अधिकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; महिला IPS चे खासगी व्हिडिओ पतीला पाठवून ब्लॅकमेलचा आरोप

Sardar Vallabhbhai Patel National Police Academy : एका प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक

Sardar Vallabhbhai Patel National Police Academy

Sardar Vallabhbhai Patel National Police Academy : एका प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याने विषारी पदार्थाचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.उदय कुष्णा रेडी असं या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

याच अकादमीत (Sardar Vallabhbhai Patel National Police Academy) प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पतीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा गंभीर आरोप उदय कृष्णा रेड्डीवर (Uday Krishna Reddy) करण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु करण्यात आला आहे.

घटना काय?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्णा रेड्डी सरदार वल्लभाई पटेल अकादमीत प्रशिक्षण घेत होते, त्याच अकादमीत 30 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. जुन महिन्यापासून सोशल मीडियावर रेड्डी हे अश्लील मेसेज पाठवत होते आणि अकादमीमध्ये इतर मित्रांसोबत अपमानकारक टिप्पणी करत होते असा आरोप प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे.

तर 9 आणि 10 जुलै रोजी रेड्डी यांनी पीडित महिला आयपीएस अधिकाऱ्याचा रस्ता अडवून त्यांना जबरदस्तीने रुममध्ये नेलं, केस ओढले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आरोपीने सहमतीशिवाय प्रशिक्षणार्थी महिला आयपीएस अधिकाऱ्याचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते व्हिडिओ पतीला पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याने 18 जुलै रोजी अट्टापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रेड्डी यांनी अकादमी सोडून निघून गेले होते आणि सर्व आरोप खोटे असून लवकरच सत्य समोर येईल असा विश्वसा व्यक्त केला आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, कठोर शिक्षा होणार; PM मोदी पहिल्यांदाच बोलले-

तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ट्रेनी आयपीएस अधिकारीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी पोट साफ करण्याची प्रक्रिया केली मात्र डॉक्टरांना कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

follow us