Ram Shinde VS Vikhe : तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांवर पडला भारी; राम शिंदेंचा पालकमंत्री विखेंना धक्का?

  • Written By: Published:
Ram Shinde VS Vikhe : तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांवर पडला भारी; राम शिंदेंचा पालकमंत्री विखेंना धक्का?

Ahmednagar Politics: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर नगर जिल्ह्यातील भाजपमधील वाद उफाळून आला आहे. आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे लोकसभेच्या तिकीटासाठी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट भिडत आहेत. आता तर संगमनेरमधील तालुकाध्यक्षला काढण्यावरून चांगलाच वाद झाला. संगमनेरची तालुका कार्यकारिणी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी बरखास्त केली. त्यामुळे भाजपमध्ये जुना व नव्या वाद उफाळून आला. आमदार प्रा. राम शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत लक्ष वेधले. तर प्रदेशाध्यक्ष यांनी दखल घेतली. त्यामुळे विखे गटाला मानणारे जिल्हाध्यक्ष लंघे यांनी तालुका कार्यकारिणी बरखास्ताची निर्णयच मागे घेतला. त्यामुळे विखे यांना एकप्रकारे शिंदेंनी धक्काच दिला आहे.

रामदास कदमांनी दुसऱ्या मुलालाही ‘सेट’ केलं… CM शिंदेंकडून MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती

तालुका कार्यकारिणी नुकतीच तीन महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यातच काही नव्या व जुन्या कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. त्यातून जिल्हाध्यक्ष लंघे यांनी संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव लांडगे यांच्या नेतृत्वाखालील तालुका कार्यकारिणी बरखास्त केली. बुधवारी ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यात वैभव लांडगे यांचा चार दिवसांपासून संपर्क झालेला नाही. मी स्वतः संगमनेर कार्यालयात, तुमच्या निवासस्थानी येऊन संपर्क होऊ शकला. फोनवरून संपर्क झाल्यानंतर तुम्ही तालुकाध्यक्षपदावर राहणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द करत असल्याचे जिल्हाध्यक्षांनी वैभव लांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हेवेदावे समोर आणत बूथ पातळीवर एका कार्यकर्त्याला राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला. दबाव टाकूनही राजीनामा देत नाही. त्यामुळे संपर्क कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दबाव टाकल्याचा राजकीय चर्चा आहे.

नगर दक्षिण लोकसभेवरुन रस्सीखेच! राम शिंदे हे विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक का?

सध्या विखे यांना कोंडीत पकडण्याची संधी शोधणाऱ्या आमदार राम शिंदे व नगर दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी थेट प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे याबाबत लक्ष वेधले. त्यानंतर भाजपचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष लंघे यांच्या संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय स्थगित करत असल्याचे पत्रच संगमनेर तालुकाध्यक्ष लांडगे यांना पाठविले आहे. तर घडलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube