BCCI IPL team owner Meeting : बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांनी आयपीएल 2025 साठी तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी खेळाडूंचं रिटेन्शन पॉलिसी काय असेल, संघाची पर्स काय असेल. इम्पॅक्ट खेळाडू नियम असेल की नाही? या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएलच्या सर्व 10 संघांच्या मालकांची 31 जुलै रोजी मुंबईत बैठक झाली. मात्र, या बैठकीतून काहीही साध्य होऊ शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय लवकरच या सर्व मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक
शाहरुख अन् नेस वाडिया
बीसीसीआय आणि आयपीएल संघांमधील बैठकीचा सर्वात मोठा मुद्दा खेळाडूंच्या कायम ठेवण्याच्या धोरणावर सहमती हा होता. 10 संघांपैकी काही संघांना शक्य तितक्या खेळाडूंना कायम ठेवण्यात रस आहे. यात KKR आणि SRH प्रमुख आहेत, तर काही संघ आहेत ज्यांना कमी खेळाडू संघात ठेवायचे आहेत आणि त्यांना मेगा लिलावात जायचं आहे. अशा संघांमध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आहेत. दरम्यान, केकेआरचा मालक शाहरुख खान आणि पंजाब किंग्जचा सहमालक नेस वाडिया यांच्यात रिटेनशनच्या मुद्द्यावरून वाद झाला. शाहरुख खानने अधिकाधिक खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजू मांडली, तर नेस वाडियाला कमी खेळाडूंना कायम ठेवायचे होते.
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन, पीएम मोदींसह शरद पवारांनी केला शोक व्यक्त
मिनी लिलावाची मागणी
केकेआर आणि एसआरएच सारख्या संघांनी बीसीसीआयसमोर अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी करत होते, त्यांनी मेगा लिलावाऐवजी मिनी लिलाव करण्याचा सल्ला दिला. या संघांचं म्हणणे आहे की, संघ तयार करण्यासाठी आणि त्याचा ब्रँड म्हणून विकास करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि यामध्ये खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने खेळाडू सोडले तर त्याचा परिणाम संघाच्या ब्रँड व्हॅल्यूवर आणि कामगिरीवर होईल. त्यामुळं मेगा ऐवजी मिनी लिलाव घेण्यात यावं. तर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा असा विश्वास आहे की आयपीएलची मजा ही मेगा लिलाव आहे. याचा फायदा खेळाडूंना झाला पाहिजे.