Download App

दिलासादायक! नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या मुंबईची स्थिती

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढला आहे. आज दिवसभरात (सोमवारी) कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे आढळून आली आहे. आज कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले असून त्यात आदल्या दिवसाच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या ८१,५०,२५७ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

आकडेवारीनुसार, मुंबई शहरात संसर्गामुळे एका मृत्यूनंतर मृतांची संख्या 1,48,460 झाली आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 788 रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात नवीन रुग्ण आल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,667 वर पोहोचली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मातृशोक

सोमवारी (10 एप्रिल) मुंबई विभागात सर्वाधिक 228 रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यापाठोपाठ पुणे विभागात 50, नागपूर विभागात 18, अकोला विभागात 10, लातूर विभागात 8 आणि नाशिक विभागात आणि कोल्हापूर विभागात प्रत्येकी पाच प्रकरणे समोर आली. मुंबई शहरात 95 नवीन प्रकरणे आणि एक मृत्यू झाला आहे, ज्यामुळे संसर्गाची संख्या 11,58,060 झाली आहे आणि शहरातील कोविड-19 मृत्यूची संख्या 19,750 झाली आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोमवारी सांगितले की, मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि अभ्यागतांसाठी फेस मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 247 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या 79,97,130 झाली आहे.

Tags

follow us