भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मातृशोक

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मातृशोक

Condolences to BJP National Secretary Vinod Tawde :भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde)यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई विजया श्रीधर तावडे (Vijaya Sridhar Tawde) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात मुलं विनोद तावडे, विलास तावडे, मुलगी जया कदम, जावई यांच्यासह सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (दि.11) सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात नगरची “मदार”

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचं भाजपकडून राज्यभरात आयोजन केलं आहे. आज पुण्यात विनोद तावडे हे सावरकर यात्रेत सहभागी होते. सावरकर यात्रेच्या समोरोपाच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे उपस्थित होते. त्याचवेळी तावडेंना आई विजया तावडे यांच्या निधनाची बातमी मिळाली. आईच्या निधनाची बातमी कळताच विनोद तावडे हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले.

महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे लालबाग येथील तेजुकाया मॅन्शनच्या छोट्या खोलीत गेले. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले. वडीलांच्या प्रेरणेतूनच विनोद तावडे यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक राज्यांच्या निवडणूक काळात प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube