Download App

Deepak Kesarkar : गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा घेतली. यावरुन आदित्य ठाकरेंनी वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल तर राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

दीपक केसरकर म्हणाले, मला तुलना करायची नाही. मुख्यमंत्री मुळचे मुंबईचे रहिवासी आहेत. त्याला गल्लीमध्ये फिरणं म्हटले तर हरकत नाही. त्या गल्लीला कमीपणा मानण्याची गरज नाही. ती आमची संस्कृती आहे. हे मतांसाठी कोळी महोत्सवात जातात. आम्ही त्यांना रोजगार मिळवून देणार आहोत. ज्यांना गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशीही टीका त्यांनी केली.

नेहमी नेहमी बोलत राहिले की त्यातली मज्जा निघून जाते. ज्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील लोक न्याय मागत होते, तेव्हा ते न्याय देऊ शकले नाही. म्हणून कोळी बांधव मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी आले. कोळीबाधवांना सत्कार करण्याला गल्ली गल्लीत फिरणे असे म्हटले तर काही फरक पडत नाही, असे केसरकर म्हणाले.

मच्छिमार बांधवांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक व्हेईकल देत आहोत. त्या गल्लीमध्ये फिरण्यासाठी आणि वृद्धांना जाण्यासाठी आम्ही व्हेईकल देत आहोत, असा टोला दीपक केसरकारांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

Tags

follow us