Download App

Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात डिझायनर अनिक्षाला (Designer Aniksha) अटक करण्यात आली आहे. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमृता फडणवीस प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली होती. या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहमंत्र्याच्या घरातीलच महिला सुरक्षित नाहीत जनता काय सुरक्षित असणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांच्या बद्दल चुकीच्या घटना घडत आहेत. अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत. देवेंद्र आमचे लहान भाऊ आहेत. त्यांच्याबद्दल कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर त्याचं समर्थन करण्याचे कारण नाही. अनिक्षा प्रकरण हे 2015-16 च्या दरम्यानची घटना आहे. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. आता पुन्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्याच्या घरातच महिला सुरक्षित नाहीत तर महाराष्ट्रातील जनतेला हे सरकार सुरक्षित कसे ठेऊ शकते? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

राणेंचा राजीनामा, वैभव नाईकांचं वक्तव्य; कानफाटात मारली असती राणेंचा प्रहार

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Tags

follow us