राणेंचा राजीनामा, वैभव नाईकांचं वक्तव्य; कानफाटात मारली असती राणेंचा प्रहार

  • Written By: Published:
Vaibhav Naik Narayan Rane

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले मी जर तेथे असतो तर वैभव नाईकांच्या कानफडात मारली असती. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले होते कि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोन महिन्यात राजीनामा देतील. वैभव नाईकांच्या त्या वक्तव्याचा राणेंनी चांगलाच समाचार घेतला. तसेच यावेळी उपस्थिताना राणेंनी आवाहन केले कि जिल्हापरिषद असो किंवा नगरपालिका असो एकही जागा विरोधांना मिळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्याची आहे. या जिल्ह्यात जो विकास झाला तो आम्हीच केला आहे.

माझा पक्ष या राज्यात आणि देशात सत्तेत आहे मग मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा कसा देईल आम्हाला आता आपल्या राजातून मोदीजींच्या नेतृत्वात 45 खासदार देशाच्या संसदेत पाठवायचये आहेत तसेच आपल्या या मतदार संघात भावी खासदार देखील आपल्याच पक्षाचा असेल.

Pankaja Munde : ‘गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधू नका, त्यापेक्षा….’ 

आमचे कुटुंब रेअजकर्णात पैसे कमवायला नाहीतर विकास आणि सेवा करायला आले आहे. मी ज्यापद्धतीने काम कार्टी त्याच पद्धतीने माझी मूळ नितेश आणि निलेश जनसेवेचे काम करतात. आम्ही पैसे कमावण्यासाठी व्यवसाय करतो आम्हाला राजकारण करण्याची गरज नाही. तुम्हाला शिवगर्जना पाहायची आहे मग मी ही माझी गर्जना थांबवतो.

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube