Download App

Devendra Fadanvis ठरले जपानच्या कोयासन विद्यापीठाची ‘मानद डॉक्टरेट’ मिळवणारे पहिले भारतीय

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आली. हा दीक्षांत सोहळा आज (26 डिसेंबरला) मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये पार पडला. तर जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून ही पदवी मिळवणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत.

कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला

दरम्यान कोयासन या विद्यापीठाने गेल्या 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टर ही पदवी देण्याचे निर्णय घेतला. यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्यासाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?

मुंबईमध्ये पार पडलेल्या या दीक्षांत समारंभाला कोयासन विद्यापीठाचे प्राध्यापक इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशीयो जपानचे मुंबईतील वाणिज्य दूध डॉक्टर फुकाहोरी यासुकाता आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या दीक्षांत समारोहाचा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, कोयासन विद्यापीठ जापानतर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यास दीक्षांत समारंभ. यासाठी मी अत्यंत आभारी आहे.

तर ऑगस्ट 2023 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली होती. त्यावेळेस विद्यापीठाचे दिन कोयासन यांनी फडणवीस यांना विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात येणार असल्याचे जाहीर केलं होतं.

Tags

follow us