Download App

शिवतीर्थवर लॉजिंग-बोर्डिंग सुरु करावं; फडणवीसांच्या भेटीनंतर राऊतांनी दिली बिझनेस आयडिया

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Fadanvis Raj Thackeray Meets : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटनांच्या आणि प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच काल (दि. 29) रोजी रात्री दहाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उत आला आहे. या भेटीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला आहे.

ऑडियो क्लिप व्हायरल झाली अन् धानोकरांचं तिकीट डिक्लेअर झालं… 2019 मध्ये काय घडलं होतं?

फडणवीसांची ही भेट ठाकरे गटाला शह देण्यासाठी होती का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, असे इकडे तिकडे दहावेळा जाऊरन शह देताता का असे म्हणत कशाला उगाच जाता येता फडणवीसांना तिथे (शीवतिर्थावर) लॉजिंग-बोर्डिंग जरी केलं तिथे गेले आठ दिवस राहिले तरी आम्हाला काही अडचण नाही असे म्हणत राऊतांना कालच्या भेटीचा समाचार घेतला.

Wrestlers Protest : ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल…

राज ठाकरेंचं कौतुक अन् टोला

यावेळी राऊतांनी राज ठाकरेंचं कौतुक केले. ते म्हणाले की, राज ठाकरे उत्तम होस्ट असून, ते पहिल्यापासून लोकांचे आगत-स्वागत अतिशय चांगले करतात. फडणवीस काय अजूनही काही लोकांनी जावं असेही ते एकनाथ शिंदेंचे नाव न घेता म्हणाले. तिथे जाणाऱ्यांनी शिवतीर्थावर आठ दिवस राहवं तिथे वॉकला जावं तिथे चांगली हॉटेल्स आणि उत्तम पदार्थ मिळतात त्याचा आनंद घ्यावा असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी देत, कोण कुणाकडे जात यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही. शिवसेना शिवसेनेच्या जागेवर आहे.

भाजपवर हल्लाबोल

यावेळी राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सर्व पक्षांना संपवणं हे भाजपचं कामं आहे. मोदी हे बॉस आहेत, असं भक्तांनी जाहीर केलं, ऑस्ट्रेलियात मोदी जाऊन आल्यानंतर सात राज्यांच्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळणार नाही, हे तेथील सरकारनं जाहीर केलं आहे, हे मोदी बॉस असल्याचे किंवा मोदींनी देशाची मान उंच केल्याचं लक्षणं नक्कीत नाही.

Video : या’ कारणांमुळे पेटला जेजुरी गडाच्या विश्वस्तपदाचा वाद

आम्ही पुन्हा १९ खासदार निवडून आणू – संजय राऊत

मोदी सरकारला नऊ वर्षे झाली. देशातील दहशतवाद मोदींनी कमी केला असं म्हटलं जात आहे. मात्र, तसं अजितबात नाहीये.  आजही काश्मीर पंडीताची हत्या सुरु असून, गेल्या एक महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. देशाचे गृहमंत्रीदेखील तिथे पाय ठेवू शकत नाहीये असे म्हणत आम्ही पुन्हा १९ खासदार निवडून आणू असा विश्वास राऊतांनी बोलताना व्यक्त केला. प्रकाश आंबेडकरांकडून एक प्रस्ताव मागवला आहे. कुणी-कुणाला भेटलं म्हणून आम्ही अजिबात फरक पडणार नाही.

Tags

follow us