Devendra Fadnavis ; विरोधकांना अधिवेशनाचा विषयच माहिती नाही, पत्राऐवजी ग्रंथच लिहिला

Maharashtra Monsoon Session 2023 : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आले आहे. मी पहिल्यांदा असे पाहिले की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथच दिला आहे. पण आमची सर्व गोष्टीवर चर्चा करण्याची […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Maharashtra Monsoon Session 2023 : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आले आहे. मी पहिल्यांदा असे पाहिले की विरोधी पक्षाला विषयच माहित नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथच दिला आहे. पण आमची सर्व गोष्टीवर चर्चा करण्याची तयारी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमची ताकद वाढलेली आहे पण या शक्तीचा कुठेही दुरउपयोग न करता जास्तीत जास्त चर्चा घडू. जे लोक हिताचे प्रश्न विरोधी पक्ष उचलेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विरोधी पक्ष अजूनही या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीमध्ये निर्माण झालेल्या संस्थांनी ज्या सरकारला कायदेशीर मान्यता दिली आहे, अशा सरकारला बेकादेशीर आणि असंवैधानिक म्हणायचे, हे अत्यंत चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

अजितदादांच्या इनकमिंगची चंद्रकांत पाटलांना धास्ती, चहापान कार्यक्रमातला चहा टाळला; पालकमंत्रीपद जाणार?

आमचे सरकार आले तेव्हा उद्योग पळवले जातात असे आरोप झाले पण आजची परिस्थिती अशी आहे की FDI मध्ये महाराष्ट्र सरकार पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता, 2020-21 मध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेले होते. 2021-22 मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर होते. आता पुन्हा 2022-23 मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version