MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल निकाल दिला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे. असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!
भाजप नेते आशिष शेलार यांची तिखट प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पद सोडावे लागले, खासदार गमावले… आमदार, नगरसेवक आणि संपूर्ण पक्ष ही हातून गेला… आता तर पक्षप्रमुख पदही हाती राहिले नाही… हे सगळे एका “अहंकाराने” “करुन दाखवले”! पुराण आणि इतिहासातील अहंकारी पत्रांमधे आज आधुनिक भारतातील एका “मर्द” नावाची भर पडली. आता बिलकिस बानो वर चर्चा करा… सरकार पडण्याच्या नव्या तारखा द्या… रिकामटेकडा खूप वेळ आहे!! पत्रकार पोपटलाल यांच्या तोंडून अजूनही अहंकाराची वाजवत बसा पुंगी… मग सुटून जाईल उरली सुरली राजकीय फाटकी लुंगी, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी एक्सवरुन (ट्विटर) उद्धव ठाकरेंना लागवला आहे.
‘नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’; उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर सडकून टीका
सर्वोच्च न्यायालयात लोकशाही नक्कीच जिंकेल
विद्यमान राजकीय व्यवस्था पाहता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अनपेक्षित नाही. या क्षणाला महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. ही केवळ उद्धव ठाकरेंची लढाई नाही तर हा लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. लोकशाही नक्कीच जिंकेल, अशी मला आशा आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
भगवान के घर देर हे, अंधेर नहीं
निकाल काहीही लागला तरी लोक सत्य जाणून आहेत. त्यामुळे तुमचा हा आनंद फक्त येणाऱ्या निवडणुकी पर्यंत. त्यानंतर जनतेच्या न्यायालयात होणार खरा न्याय आणि एक लक्षात ठेवा, ये पब्लिक है, ये सब जानती है. तुमचा या निवडणुकीत जनताच “करेक्ट कार्यक्रम” करणार हे निश्चित, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.