Download App

देशाचा जीडीपी जैन समाजाभोवतीच आहे…; फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होणार?

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : ज्यांच्या पाठीमागे जितो आणि जैन समाज (Jain community) आहे. त्यांना संसाधनांची कधीच कमतरता पडत नाहीत. देशाचा जीडीपी (GDP) जैन समाजाजवळ आहे, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.  त्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्यचाी शक्यता आहे. ठाण्यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल (Dharamveer Anand Dighe Cancer Hospital) व त्रिमंदिर संकुलाचा भूमिपूजन सोहळा झाले. त्या कार्यक्रमात फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. (Devendra Fadnavis On Jain community over GDP)

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, देशात झपाट्याने वाढणारी कॅन्सरची परिस्थिती, त्यावर होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची होणारी गैरसोय हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे शहरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टने धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल या भागात सुरू केले, ही अभिनंदनाची बाब आहे. खरं म्हणजे, जेव्हा धर्मवीर आनंद दिघे या भागात सेवा कार्य करायचं, तेव्हा दुर्गम भागातील आदिवासीही त्यांच्या अॅम्बुलन्स सेवेमुळं वाचल्याचं आपण पाहिलं. त्यामुळं राजकीय नेत्यापेक्षाही समाज सेवा करणारा नेता म्हणून दिघेंकडे पाहिलं जायचं. त्यांचाच वारसा आणि परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण या भूमिकेतून ते सेवा कार्य करत आहे, असं फडणवीस म्हणाले.

दाखवलेले स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची लोक धुलाई करतात, नितीन गडकरींची फडणवीसांसमोर टोलेबाजी 

यावेळी बोलतांना ते म्हणाले, ज्यांच्या पाठीमागे जीतो आणि जैन समाज आहे. त्यांना संसाधनांची कधीच कमतरात पडत नाहीत. देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ आहे. त्यांच्या श्रमातून त्यांनी तो उभा केला. आज देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचं मोठं योगदान आहे. जैन समाजाशिवाय, आपला जीडीपी पूर्णच होऊ शकत नाही. हा समाज केवळ जीडीपीमध्ये आपलं योगदान देऊन थांबत नाही. तर समाजसेवेसाठी पैसे देतो. कमावलेला पैसा देशसेवेसाठी द्यायचं, हे तत्व मोठ्या प्रमाणात जैन समाजात पाहायला मिळतं, त्यामुळंच देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, डॉ. श्रीखंडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, मंत्री शंभुराजे देसाई, जितो फाऊंडेशचे पदाधिकारी आदि उपस्थित होते

Tags

follow us