दाखवलेले स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची लोक धुलाई करतात, नितीन गडकरींची फडणवीसांसमोर टोलेबाजी

दाखवलेले स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांची लोक धुलाई करतात, नितीन गडकरींची फडणवीसांसमोर टोलेबाजी

Nitin Gadkari News : लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे भाष्य केलं आहे. फडणवीसांसमोरच गडकरींनी हे विधान केल्याने चर्चा सुरु झाली आहे.

नितीशकुमारांशी आमचे चांगले संबंध, ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात; आठवलेंचं मोठं विधान

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘माझे स्वप्न आहे, बोटीत बसून अंबाझरी तलाव ते पारडीपर्यंत नाग नदीतून जायचे. लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई करत असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यानंतर या कार्यक्रमातील उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला होता.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

नितीन गडकरींची रोखठोकपणे भूमिका मांडणार नेता म्हणून ओळख आहे. अनेकदा आपल्या विधानांमुळे त्यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे. अशातच आता केलेल्या विधानाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तसेच राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरही गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, या फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील. पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो. कठोर टीका करायचो. पण सर्वांशी वैयक्तिक मैत्री होती. पण आता थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटते, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमीपूजनचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी गडकरींची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान गडकरींनी हे विधान केल्याने राज्याच्या राजकारणात आता या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube