Download App

…तर नाना पटोलेंनी लादेनची भेट घेतली, फडणवीसांचे प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Nana Patole: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील सीबीआयच्या चौकशीवरून भाजप व काँग्रेसमधील नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून थेट भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मक उत्तर दिले आहे. नाना पटोले हे लादेनला भेटले, असे मी म्हणू का ?, उगाच मूर्खांसारखे बोलतात, असे फडणवीस यांनी म्हणत नाना पटोलेंनी फटकारले आहे.

वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले आहे. त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काही तरी संशयास्पद आहे, किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाची पोलखोल ते करू शकतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे. त्याला मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी लादेनची भेट घेतली आहे, असे मी म्हणून का, मूर्खांसारखे बोलणाऱ्यांना मूर्खासारखे उत्तर द्यावे लागते, असे फडणवीस म्हणाले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणा, राज्यातील यंत्रणा या स्वतंत्रपणे काम करत आहे. या यंत्रणेवर दबाव असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात काही सापडले नाही, तर त्यांनी ईडी सोडून देईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags

follow us