मुंबई : टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर काल (दि.4) मुंबईत भारतीय संघाची ओपन बसमधून विजयी रॅली काढण्यात आली. भारतीय संघाच कौतुक करण्यासाठी करोडो मुंबईर रस्त्यावर उरतले होते. नजर जाईल तिथपर्यंत लोकांची गर्दी होती. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची मोठी जबाबदारी होती. तर, दुसरीकडे या जल्लोषात काही होणार नाही ना? आणि सगळे घरी जाईपर्यंत आपली विकेट पडणार नाही ना? अशी काळजी मला होती असे म्हणत फडणवीसांनी त्यांचे मन मोकळं केलं आहे. ते विधानभवनात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Devendr Fadnavis Speech In Vidhabhavan Program)
मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस जाहीर
फडणवीस म्हणाले की, काल मुंबईत ज्या पद्धतीने भारतीय संघाची विजयी रॅली निघाली आणि ती निर्विघ्नपणे पार पडली यात खरचं मुंबई पोलिसांचा मोठा वाटा आहे. काल आम्ही देखील जीव मुठीत घरून बसलो होतो. कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एकत्र जमा होणं म्हणजे ते घरी जाईपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना? अशा प्रकारची परिस्थिती असते. पण मुंबई पोलिसांनी खरोखरीच चांगल काम केलं असे फडणवीस म्हणाले. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील हे अपेक्षित केलंच होतं. पण अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले हे मुंबईकरांचे जे प्रेम आहे ते ओसंडून वाहत होतं पण यातही मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही त्यामुळे मी मुंबईकरांचेही अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी करून दिली नेत्यांची खास ओळख
भाषणाच्या सुरूवातीला फडणवीसांनी आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन अशी ओळख फडणवीसांनी शिंदेंची करून दिली. सभागृहाचे अंपायर राहुल नार्वेकर आणि उपकर्णधार अजित पवार अशा क्रिकेटच्या खास शैलीत नेत्यांची ओळख करून दिली. तर निलम गोऱ्हेंना थर्ड अंपायर असे म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांना अंपायर असेच म्हणावे लागेल असे फडणीवीस म्हणाले. त्यांच्या या खास शैलीतील ओळखीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.
सूर्याच्या हातात कॅच बसला नसला तर मी त्याला बसवला असता; रोहितच्या भाषणावर सभागृहात पिकला हशा
राजकारण्यांनी रोहित शर्माकडून शिकावं
यावेळी फडणवीसांनी राजकीय नेत्यांनी रोहित शर्माकडून शिकावं असा सल्ला दिला. रोहित शर्मा जेव्हा पत्रकार परिषद घेतो तेव्हा तो कमीतकमी बोलून देखील आपल्या देहबोलीवरून उत्तर देतो, हे सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे ती कला आहे ही कला राजकारण्यांनी शिकावी असे ते म्हणाले.
🕠 5.23pm | 5-7-2024📍 Vidhan Bhavan, Mumbai | संध्या. ५.२३ वा. | ५-७-२०२४📍 विधान भवन, मुंबई.
LIVE | टी-20 विश्वचषक विजेता भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार@BCCI @ImRo45 #Maharashtra #Mumbai #CricketWorldCup #TeamIndia https://t.co/wGiMyCtzpi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2024