विविध मागण्यांसाठी मुंबईत डॉक्टरांचा मोर्चा..

मुंबईत विविध मागण्यांसाठी डॉक्टारांनी मोर्चा काढला आहे. यावेळी नवीन वरिष्ठ निवासी पदे लवकरात लवकर भरुन निर्वाह भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मोर्चादरम्यान, आम्हांला न्याय द्या, अशा घोषणा डॉक्टरांकडून देण्यात आल्या. राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्यावतीने आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान, विविध मागण्या मान्य न केल्यास संपावर […]

Untitled Design (7)

Untitled Design (7)

मुंबईत विविध मागण्यांसाठी डॉक्टारांनी मोर्चा काढला आहे. यावेळी नवीन वरिष्ठ निवासी पदे लवकरात लवकर भरुन निर्वाह भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मोर्चादरम्यान, आम्हांला न्याय द्या, अशा घोषणा डॉक्टरांकडून देण्यात आल्या.

राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्यावतीने आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान, विविध मागण्या मान्य न केल्यास संपावर जाणार असल्याचा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. तर मुंबईतील सायन, नायर, कूपर, बीएमसीच्या चार रुग्णालयांचे केईएमसह संपूर्ण महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरही संपावर आज संपावर गेले आहेत.

काय आहेत मागण्या?

वरिष्ठ निवासी पदावर नवीन पदे भरण्यात यावी
निर्वाह भत्ता सातव्या वेतन आयोगाच्या आधारे असावा
कोविड सेवा थकबाकीचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
सहकारी व सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत, महागाई भत्ता त्वरित द्यावा
सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, ज्येष्ठ निवासींच्या वेतनातील असमानता दूर करावी.
डॉक्टरांची रिक्त पदे भरून 2018 पासून प्रलंबित असलेली थकबाकी भरली जावी

बृहन्मुंबई महापालिकेवर आज डॉक्टरांच्या संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टरांकडून राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार करण्यात आले आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

तर अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निदर्शने केली जात आहेत.

Exit mobile version