Documents Can Registered At Any Stamp Office In Mumbai : महसूल विभागाने मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी (Registration & Stamps) करता येणार आहे. राज्य सरकारकडून क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्यात आली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
काय बदलणार आहे?
आधी नागरिकांना केवळ त्यांच्या क्षेत्रातील मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता (Registration & Stamps) येत असे.आता मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करू (Mumbai) शकतात. दस्त नोंदणीसाठी संबंधित भागातील कार्यालयात जाण्याची अट काढून टाकण्यात आली (Revenue Department) आहे.
कोणत्या मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येईल?
मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक आता (chandrashekhar bawankule) खालील सहा मुद्रांक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करू शकतात:
बोरिवली
कुर्ला
अंधेरी
मुंबई शहर
ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालय (अंमलबजावणी एक)
ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालय (अंमलबजावणी दोन)
यामध्ये मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र तसेच इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी करता येईल.
फायदे:
1. मुंबईकरांचा वेळ आणि धावपळ वाचणार आहे.
2. निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज जलदगतीने होईल.
3. शासनाकडून याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे.
महसूल विभागाचा आणखी महत्त्वाचा निर्णय:
– जागा मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांत मोजणी होणार आहे.
– राज्यात खासगी भूमापक मोजणीसाठी येणार आहेत.
– खासगी भूमापकांच्या माध्यमातून राज्याची मोजणी जलदगतीने होईल.
– सीटी सर्वे ऑफिसर व डिप्युटी एसएलआर यांच्याकडून मोजणी सर्टिफाईड केली जाईल.
– याअंतर्गत राज्यातील साडे तीन कोटी लोकांची मोजणी केली जाणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, पूर्वी मोजणीसाठी 90 ते 160 दिवस लागू शकत होते; आता फक्त 30 दिवसांत मोजणी पूर्ण होईल. या निर्णयामुळे मुंबईकरांना दस्त नोंदणीसाठी सुलभ सुविधा मिळाली आहे, तसेच मोजणी प्रक्रिया जलद होऊन भूसंपादन व इतर सरकारी प्रकल्पांसाठी तयारी सुलभ होणार आहे.