Download App

‘डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले’

Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन (Shiv Sena Anniversary) काल साजरा झाला. आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचे प्रथमच दोन वर्धापन दिन साजरा झाले. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना गळ्याला मोठा पट्टा होता पण डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्रीपदावरुन जाताना काय काय केलं. वर्षावरुन खाली जाताना जसं घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला. गळ्याला पट्टा होता, मोठ्या मोठ्या बॅगा होत्या, काही लोकं रडत होते म्हणजे रडायला लावले होते. जसे काय आपल्या सात बाराच्या घरातून बाहेर पडत आहेत. कोणाचं मुख्यमंत्रीपद, कार्यालय, वर्षा? हे काय सत्ता येते जाते. एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्याच दिवशी पट्टा गायब, सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. ही कोणाची करामत माहिती आहे? डॉक्टर एकनाथ शिंदे.

20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

खोके कुठं गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांची पुण्याई आहे. पण तुम्ही आपल्या मर्यादेत राहा अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कृतीने उत्तर देतो. हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुखापासून राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. सर्व काही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाले आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? गेल्या वर्षी 20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, अशी टीका एकनाथ शिंदे केली.

हिंदूंना धोका असेल तर मोदींना राज्य करण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आहे. तुम्हाला बाळासाहेबांच्या नावाने सहानुभूती मिळणार नाही. आमची चूक झाली असती, विश्वासघात केला असता तर 40 आमदार आमच्यासोबत आले नसते. लोक तुमच्या सोबत राहतील तोपर्यंत ठीक आहे, पण जर लोकांनी तुम्हाला सोडले तर ते कचरा बनतात. एक दिवस तुम्हीही कचरा बनून जाल, असा हल्लाबोल एकना शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us