Download App

डॉ. तात्यावर लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर; नव्या नियुक्तीचे आदेश

जेजे रुग्णालयात गेले काही दिवस डॉक्टरांमध्ये संघर्ष सुरु होता. या संघर्षातून नेत्र विभागाचे माजी प्रमुख तसेच सध्या करारानुसार सेवेत असलेले डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिला होता. तर या विभागाच्या प्रमुख रागिणी परेख यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. हे दोन्ही राजीनामे  सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

लहानेंचा राजीनामा २४ तासाच्या आत स्वीकारण्यात आला आहे. तर रागिणी पारेख यांचाही स्वेच्छा निवृत्तीसाठी ९० दिवसांची वाट न पाहता २४ तासातच स्वीकारण्यात आला आहे. लहानेंच्या जागी तात्काळ नवी नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहे. डॉ. लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वी आपले राजीनामे दिले होते. जेजेच्या डीन पल्लवी सापळे यांच्या जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले होते. यानंतर आता राज्य सरकारने त्यांचा हा राजीनामा मंजूर केला आहे.

यानंतर डॉ. तात्याराव लहानेंनी आपली प्रतिक्रिया दिली. मला मुक्त केल्यामुळे मी शासनाचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. मला आनंद झाला आहे, असे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लहाने यांचे २००९ पासून जेजेवर एकछत्री अंमल होता. जेजेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्ववाद उफाळून येतो. यापूर्वी डॉ. लहाने विरुद्ध डॉ अशोक आंनद, डॉ. मेडेकर आणि डॉक्टर पल्लवी सापळे हे वाद चंगलेच गाजले होते. अनेक वेळा हा वाद कोर्टात तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे नेला. तर काही जणांची रवानगी ही थेट जेजे बाहेर करण्यात आली होती.

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

डॉ. लहाने यांचे राजकिय संबंध आणि सामाजिक वजन याविषयी कमालीचा दरारा जेजे रुग्णालयात होता. त्यांची शिस्त आणि कडक नियमनाविरोधात चार वर्षांपूर्वी नेत्र विभागाचे ३०० डॉक्टर यांनी लहाने यांच्या विरोधात बंड पुकारला होता.

राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ! सचिन पायलट अखेर ‘तो’ निर्णय घेण्याच्या तयारीत

कालांतराने हा वाद निवाळला. पल्लवी सापळे जेजेच्या डीन झाल्या. लहाने यांच्या गटातील डॉक्टर यांची चौकशी सुरू झाली. लहाने यांचा मुलगा, सून तसेच नेत्र विभागाच्या प्रमुख रागिनी पारेख यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला होता. यात डॉक्टर लहाने यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.

 

 

Tags

follow us