Download App

सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेसकोड ; तोकडे कपडे घालणाऱ्यांना मज्जाव, मंदिर न्यासाचा मोठा निर्णय

Sri Siddhivinayak: आपण घर लग्नसमारंभ, पूजासाठी जसे अंगभर कपडे घालतो, त्या पद्धतीने मंदिरात येताना पेहराव करून यावा.

  • Written By: Last Updated:

Dress code now enforced at Sri Siddhivinayak Temple decision of the temple trust: मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात (Sri Siddhivinayak Temple) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड (Dress code) लागू करण्यात आलाय. आपण घर लग्नसमारंभ, पूजासाठी जसे अंगभर कपडे घालतो, त्या पद्धतीने मंदिरात येताना पेहराव करून यावा, असा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे ट्रस्टकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यापासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

उषा प्रवीण गांधी कॉलेजमध्ये बाजारा एयुपीजीला सुरुवात, विद्यार्थी बनले व्यावसायिक

तोकडे कपडे घालून येणाऱ्यांमुळे भाविकांच्या मनात संकोच निर्माण होतो. याबाबच्या काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव शालिनता व पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोत वाटणारा नसावा. यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

मराठी चित्रपटांना मिळणार ‘बूस्टर’; राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवाची घोषणा


एकाच प्रकारचे कपडे घालावे, असे बंधन नाही-लोंढे

याबाबत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे म्हणाले, आपण बाप्पाचे दर्शन घेतोय. त्यामुळे मंदिरातील पावित्रता नष्ट होणार नाही, असे पेहराव असावा. एकाच प्रकारचे कपडे घालावे, असे काय बंधन नाही. जो पेहराव कराल तो समोरच्याला संकोच करेल असा नसावा, असे आमचे प्रामाणिक मत आहे. त्या प्रामाणिक मताप्रमाणे भक्त सुद्धा प्रामाणिकपणाने आमच्या निर्णयाचे स्वागत करतील.

श्री सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा वेडावाकडा पेहराव न करता. आपण जसा घरामध्ये पूजा असेल लग्न असेल, त्याच्या पद्धतीने आपण पेहराव करतो. तसाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरात यावे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. परंतु यापुढे तोकडे कपडे असणारे, समोरच्याला संकोच करतील, अशी पद्धतीचे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

follow us