Temple Dress Code : तुळजापूरचा निर्णय मागे पण ड्रेस कोडचं लोण राज्यभर; नागपूर, पुणे, जळगावातही नियम लागू

Temple Dress Code : तुळजापूरचा निर्णय मागे पण ड्रेस कोडचं लोण राज्यभर; नागपूर, पुणे, जळगावातही नियम लागू

Temple Dress Code in Maharashtra : नुकतचं काही दिवसांपूर्वी राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवीचं शक्तिपीठ तुळजापूरच्या मंदीरामध्ये भाविकांना प्रवेशासाठी पोशाखाविषयी नियमावली घालून देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातून त्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर मंदीर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र तुळजापूरचा निर्णय मागे घेतला असला तरी या ड्रेसकोडचा नियमाचं लोण राज्यभर लोण पसरलं आहे.

Pune Crime : अभ्यासासाठी दोघे रात्री एकत्र आले; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला प्रियकराचा मृतदेह

तुळजापूरनंतर आता नागपूरमधील चार मंदिरात ड्रेससकोडचा नियम लागू करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि जळगावमध्ये देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. तर नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देखील अशीच नियनावली लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी काही विश्वस्त मंडळी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ सकारत्मिक आहेत.

IPL 2023 Final CSK vs GT: धोनीच्या प्रेमात चाहत्यांनी घालवली स्टेशनवर रात्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

यामध्ये नागपूर जिल्ह्यातील श्री गोपालकृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेलोरी), श्री बृहस्पती मंदिर (कानोलीबारा), श्री दुर्गामाता मंदिर (हिल टॉप) पुण्यातल्या वाघोलीचे वाघेश्वर मंदिर, जळगावमधील अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिर. आदी मंदिरांचा समावेश आहे.

CSK vs GT Final : जेतेपदासाठी गुरू-शिष्य भिडणार; जाणून घ्या, हेड टू हेड संभाव्य प्लेइंग इलेव्हन

तुळजापूर मंदिरामध्ये बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, अशी नियमावलीचे फलक मंदिरात लावण्यात आले होते. 18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीत. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube