CSK vs GT Final : जेतेपदासाठी गुरू-शिष्य भिडणार; जाणून घ्या, हेड टू हेड संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  • Written By: Published:
CSK vs GT Final : जेतेपदासाठी गुरू-शिष्य भिडणार; जाणून घ्या, हेड टू हेड संभाव्य प्लेइंग इलेव्हन

CSK vs GT Playing XI : मुसळधार पावसामुळे रद्द झालेल्या IPL 2023 चा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. गुरू-शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन कूल धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दीक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये जेतेपदासाठी हा सामना खेळवला जाणार आहे. जेतेपदावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडुंनी जोरदार तयारी केली असून, विजयासाठी दोन्ही संघातून सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहेत.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

चेन्नई विरुद्ध गुजरात हेड टू हेड

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने खेळवले गेले आहेत, ज्यामध्ये गुजरातने 3 तर, चेन्नईने 1 सामना जिंकला आहे. या मोसमात दोघांमध्ये दोन सामने झाले असून, त्यात चेन्नई आणि गुजरातने 1-1 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमध्ये एकूण 4 सामने, 3 लीग आणि एक प्लेऑफ सामना खेळवला गेला आहे. गुजरातने तीनही साखळी सामने जिंकले आहेत, तर चेन्नईने प्लेऑफचा सामना जिंकला आहे.
या मोसमातील पहिला साखळी सामना याच दोन्ही संघांमध्ये खेळवला गेला होता, ज्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर क्वालिफायर-1 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले, ज्यामध्ये चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवला.

Wrestlers protest : ‘गोळ्या खायला कुठे येऊ?; बजरंग पुनिया IPS अधिकाऱ्याला नडला

कसा असू शकतो संभव्य प्लेइंग इलेव्हन

IPL च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र, दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, दोन्ही संघ त्यांच्या पूर्वीच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतील असा अंदाज आहे.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

इम्पॅक्ट प्लेयर्स : साई सुदर्शन, श्रीकर भारत, ओडियन स्मिथ, आर साई किशोर, मोहित शर्मा.

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मथीश पथिराना, तुषार देशपांडे.

इम्पॅक्ट प्लेयर्स : अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, एस सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube