Wrestlers protest : ‘गोळ्या खायला कुठे येऊ?; बजरंग पुनिया IPS अधिकाऱ्याला नडला

Wrestlers protest : ‘गोळ्या खायला कुठे येऊ?; बजरंग पुनिया IPS अधिकाऱ्याला नडला

Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंविरोधामध्ये रविवारी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती.  (Wrestlers Protest March) जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड करण्यात आली. तसेच ताब्यात घेतल्यावर या कुस्तीपटूंविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. रविवारचा दिवस या घटनेमुळे खूपच गाजला असल्याचे दिसून आले.

दरम्यान महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला बळ देणाऱ्या बजरंग पुनिया याने एका आयपीएस अधिकाऱ्याला देखील खडेबोल सुनावले आहे. भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे.

परंतु त्यांच्या आंदोलनाकडे मोठ्या प्रमाणात कानाडोळा करणाऱ्या सरकार विरोधामध्ये नव्या संसद भवनात महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीसाठी जंतर मंतरहून नव्या संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटू विरोधामध्ये पोलिसांनी खूपच आक्रमक भूमिका घेतली होती, आणि काही कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेताच त्यांच्याविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडीच्या दरम्यान निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने या आंदोलना विरोधामध्ये ट्वीट केले आहे. “गरज पडली तर गोळ्याही घालू. पण तुमच्या सांगण्यावरून नाही. आता तर कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे तुम्हाला फरफटत नेऊन फेकून दिले आहे. परंतु कलम १२९ अंतर्गत पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. उचित परिस्थितीमध्ये पोलीस ते देखील करण्याची परवानगी आहे. पण ते समजण्यासाठी शिक्षित असणं गरजेचं आहे. मग, भेटूया पोस्टमार्टम टेबलवर,” असं ट्वीट डॉ.एन. सी. अस्थना या आयपीएस अधिकाऱ्याने केले आहे.

https://twitter.com/NcAsthana/status/1662857287265054721?s=20

हे संतापजनक ट्वीट बघून भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील रिट्वीट केलं आहे. “हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या मारण्याचे सांगत आहेत. भाई समोर उभा आहे, सांगा कुठे यायचंय गोळी खायला? शपथ आहे, पाठ नाही दाखवणार, छातीवर तुझी गोळ्या आम्ही झेलू. हेच आता आमच्यासोबत करणं बाकी राहिलं होत, असे असेल तर हेही चालेल”, असं चोख प्रत्युत्तर बजरंग पुनिया याने दिले आहे.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

दरम्यान रात्री गुन्हा दाखल होताच आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकने देखील यावर संतप्त सवाल करणारं ट्वीट केले आहे. दिल्ली पोलिसांना लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषण सिंह यांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी ७ दिवस लागतात. पण शांततेत आंदोलन करण्यासाठी आमच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्यासाठी ७ तासही लागले नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झाली आहे का?

येथील सरकार कशा प्रकारे आपल्या खेळाडूंशी वागत आहे, हे अवघं जग बघत आहे, असं साक्षीने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे. तसेच आंदोलक कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतरवर घडलेल्या गोंधळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलं १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३ आणि पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube