Money Laundering Teorres Investment Scam : टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात (Teorres Investment Scam) आता ईडीची एन्ट्री झालीय. कथित मनी लॉंड्रिंगची चौकशी सुरू केली जातेय. भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला होता. तर एफआयआरमध्ये (Money Laundering) 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांचा उल्लेख होता. आता याप्रकरणाची आता ED चौकशी केली जाणार आहे.
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करा; बापूसाहेब पठारेंच्या सूचना
टोरेस पोंझी स्कीम प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) संबंधित कलमांखाली ईसीआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे, तिथे आरोपींनी उच्च परताव्याचे आश्वासन देऊन निम्न-मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना फसवले. ईडीचा हा खटला मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. भाजी विक्रेत्याने असा दावा केला की, सुमारे 1.25 लाख गुंतवणूकदारांनी टोरेसमध्ये गुंतवणूक केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आलंय. टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 2 हजार तक्रारदारांकडे आतापर्यंत ईओडब्ल्यू आहे.
दरम्यान, टोरेस घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला माहिती दिली की, हजारो गुंतवणूकदारांना विकले जाणारे हिरे आणि दगड बनावट होते. त्यांनी तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे सिद्ध केलंय. तर सोन्याच्या दागिन्यांबद्दल तपशीलवार अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप
अधिकाऱ्यांनी उघड केलंय की, 500 ते 1000 रुपयांचे दगड महागड्या रत्नांच्या नावाखाली महागड्या किमतीत विकले गेले. या प्रकरणात अनेक गुंतवणुकदारांची gra-gems.com या वेबसाइटवर प्रदर्शित केलेल्या प्रमाणपत्रांचा वापर करून फसवणूक करण्यात आली. ती युक्रेनियन घोटाळेबाजांनी तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. EOW ने पुढील चौकशीसाठी त्यांची कोठडी वाढवण्यात आलीय.
EOW ला असे आढळून आलंय की, हा घोटाळा युक्रेनियन लोकांनी आखलेली एक योजना होती. यामध्ये प्रामुख्याने 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकणाऱ्या भारतीय निम्न मध्यमवर्गीयांना लक्ष्य करण्यात आलं होतं. घोटाळेबाजांनी विकल्या जाणाऱ्या दगडांची माहिती आणि ग्राहकांना प्रदान केलेल्या प्रमाणपत्रांची माहिती दर्शविणारी एक वेबसाइट तयार केली. प्रत्येक प्रमाणपत्रात एक खास क्रमांक होता, तो स्मार्ट कार्ड वापरून स्कॅन करता येतो. यामध्ये खरेदीदारांना आश्वस्त करण्यासाठी दगडाची माहिती दर्शविली जात होती.