Ekanth Shinde On Uddhav and Raj Thackeray : शिवाजी पार्कवरील कालच्या सभेत राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. आज त्याच ठिकाणी महायुतीची सभा झाली. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी उद्धव व राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. वीस वर्षापूर्वी वेगळा काय झालात. तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का ? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्याकडे मुद्देच नाही, तर बोलणार काय ? आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. मी कधीच आरोपांना उत्तर दिले नाही. मी नेहमी विकासाने उत्तर दिले आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर महायुतीचा होईल आणि मराठीच होईल. काही लोकांना निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो. ते दिवसभर नेटफ्लिक्स पाहतात आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स करतात. तुम्ही सत्तेत असताना मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी काय केले ते सांगा आहे. मराठी माणसांचे शेवटची लढाई आहे, असे भावनिक भाषण करता. मराठी माणसांचे अस्तित्व कधी धोक्यात नव्हते आणि राहणार नाही. तुमचं राजकारण धोक्यात आलं आहे. मुंबई व मराठी माणसांचे हित जपण्यासाठी आम्ही समर्थ आहेत. मुंबईवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.
मराठी माणसांसाठी काय केले सांगा ?
तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले आहे. आम्ही वीस हजार इमारती मुंबईत उभारणार आहोत. खड्डेमुक्त मुंबई करणार आहोत. झोपडपट्ट्या हटविणार आहोत. 10 हजार गिरणी कामगारांना घरं दिली आहेत. एक लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरं देणार आहोत. तेव्हा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासकामांना स्पीडब्रेकर लावले. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर अटल सेतूचे काम केले. मेट्रोचे काम सुरू केले. त्यांच्या अडेलतट्टू भूमिकांमुळे अनेक प्रकल्प रखडले होते.
तुमचा जीव लंडनामध्ये गुंतलाय…
पुर्नविकास कामांमुळे यांना खोकला होतोय. गरिबांच्या घरामुळे यांना प्रदूषण होतोय. परंतु हे बंगल्यावर बंगले बांधतायत. तुम्हाला लोकांच्या वेदना काय कळणार आहोत. तुमचं जीव लंडनमध्ये गुंतला होता. तिथे काय आहे ? मराठी माणसांचे नावाने गळा काढतात. पण निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ? असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. वीस वर्षापूर्वी वेगळा का झालात. तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का ? स्वार्थीसाठी तुम्ही एकत्र आला आहेत. ते मुंबईकरांना माहीत आहे. मराठी माणसांबाबत त्यांचे पुतणा मावशीसारखे प्रेम आहे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटंलय.
