Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jacqueline Fernandez Post: गणपत’साठी जॅकलिन फर्नांडिसचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “सिनेमाची…’
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबवण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिक मर्यादित-महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीमार्फत विविध शासकीय कामे, जसं की, परवडणारी घरे आणि शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषीमुल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प, पर्यावरण उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे करण्यास 10 जुलै 2023 मध्ये मान्यता देण्यात आली आहे.
यालाच अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर येथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समुह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यास महात्मा फुले मागासवर्ग महामंडळांकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून 25 कोटी इतक्या रकमेची 3 वर्षात व्याजासह परतफेड करण्याच्या तत्वावर या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय-
1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई येथून शासकीय बँकिंग व्यवहार करता येतात
2. ‘महाप्रित’च्या माध्यमातून ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर बांधली जातील
3. राज्यातील सूत गिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्ष कर्जावरील व्याज शासन भरणार.
4. कोराडीत सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता
5. इमारत आणि बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने मिळणार. कामगार नियमांमध्ये सुधारणा केली जाईल
6. बाराटी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमात समानता आणण्यासाठी धोरण.
7. राज्यात धर्मादाय सह आयुक्तांची चार पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
8. अहमदनगर जिल्ह्यातील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय