Download App

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेच शिवसेनेचे बॉस, मुख्यनेतेपदी निवड

मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत (ShivSena Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

MPSC Student Protest : आमदार सत्यजित तांबेंची पुण्यात धाव, विद्यार्थ्यांची घेतली बाजू

शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय
– एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली.
– शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील.
– चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय.
– राज्यातील भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरी देणे.
– सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरीमध्ये स्थान देण्याचा निर्णय.
– मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न.
– UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय.
– स्वातंत्र्यवीर सावकरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी प्रयत्न.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संजय राऊत यांनी काही आक्षेपाहार्य वक्तव्य केली होती. याबाबत आजच्या कार्यकारणीच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात आला.

तसेच आगामी निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती करून लोकसभेच्या निवडणुकीत 45 तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.

दरम्यान, शिवसेना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आले असून या पार्श्वभूमीवरच आज राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. तसेच शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल? या विषयावर चर्चा झाली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज