MPSC Student Protest : आमदार सत्यजित तांबेंची पुण्यात धाव, विद्यार्थ्यांची घेतली बाजू

MPSC Student Protest : आमदार सत्यजित तांबेंची पुण्यात धाव, विद्यार्थ्यांची घेतली बाजू

पुणे : विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आज पुण्यात धाव घेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. यावेळी त्यांनी एमपीएससी आणि राज्य सरकार यामध्ये कुठलाही समन्वय नसल्याचा आरोप केला असून एमपीएससीच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केलीय.

एमपीएससीचा पॅटर्न बदलण्यासाठी पुण्यात बालगंधर्व चौकामध्ये एमपीएससीची विद्यार्थी कालपासून आंदोलनाला बसलेले आहेत. त्यातले सहा विद्यार्थी हे उपोषण करत आहेत. त्यांना भेट देण्यासाठी आज आमदार सत्यजित तांबे पुण्यात आले होते. यावेळी तांबे म्हणाले, एकीकडे देवेंद्र फडवणीस म्हणतात सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. विरोधी पक्षनेते सुद्धा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत.

Maharashtra Politics : ‘भाजपसह शिंदे गटालाही अजित पवारांचे खोचक टोले ; म्हणाले…

सर्वांचा जर या भूमिकेला पाठिंबा असेल, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग का ऐकत नाही? हाच खरा प्रश्न असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यासाठी श्वेतपत्रिका काढा आणि राज्य सरकार आणि आयोग यांच्यामध्ये कुठे समन्वय नसल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचा आमदार सत्यजित तांबेने म्हटले आहे. एमपीएससी आयोगाला परीक्षाची पद्धती बदलण्याची अडचण काय हेच समजत नाही.

Dhanashree Verma : युजवेंद्रच्या पत्नीचा मालदीवमध्ये हॉट अंदाज

खरंतर हे गाव खेड्यातले शेतकऱ्यांचे मुलं आहेत. रोजगार करणाऱ्याचे मुलं, दुकानदाराचे मुले, आहेत. जास्त संपत्ती वाले अधिकारी होत नाहीत. हे कायद्याचे ज्ञान असलेले विद्यार्थी आहेत. ते सातत्याने आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या बाबतीत अनेक वेळेस अनेक तक्रारी येत आहेत. त्या एमपीएससीचे कार्यपद्धतीच आता बदलण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Deepak Kesarkar जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत… त्यांना व्हिप पाळावाच लागणार

एमपीएससीने यापुढे परीक्षा फीस घेतली नाही पाहिजे, कारण तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही. तर तुम्ही पैसे का गोळा करता. एक हजार जागांसाठी जर एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज देत असतील, तर हे पैसे गोळा करण्याचा धंदा बंद केला पाहिजे, असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनाही बोललो असून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube