Download App

सेना-भाजपच्या युतीत काड्या करणारा शकुनी मामा कोण?; राणेंचा रोख नेमका कुणाकडे

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane :  राज्यातील वर्तमान पत्रात काल (दि. 13) शिवसेनेची भलीमोठी जाहिरात प्रकाशित झाली. या जाहिरातील केवळ मुख्यमंत्री शिंदेंचाच फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे भाजप-सेनेच्या महायुतीत मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही जाहिरात सेनेची नव्हती असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे मंत्री शुभंराज देसाईंनी काल दिले होते. तर, आज शिवसेनेकडून सर्व वर्तमानपत्रात आणखी एक भली मोठी जाहिरात छापून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी सेना-भाजपच्या युतीत काड्या करणारा शकुनी मामा कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर

यावेळी राणेंनी प्रामुख्याने शिवनेच्या नेत्यांना आवाहन केले असून, आपल्या युतीमध्ये काड्या लावणारा संजय राजाराम राऊत कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. हा काड्या लावणार शकुनी मामा आपल्या युतीत तर आला नाही ना? असा प्रश्नदेखील नितेश राणेंनी कालच्या जाहिरातीवरून उपस्थित केला आहे.

सेना-भाजपच्या युतीत काड्या करणारा शकुनी मामा कोण?; राणेंचा रोख नेमका कुणाकडे

सर्व्हेवरून हल्लाबोल

यावेळी राणेंनी महायुतीबद्दलच्या झालेल्या सर्व्हेबद्दल केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, राऊतांनी हा सर्व्हे सरकारी बंगल्यातून केलेला होता का? असे विचारले. त्यावर नितेश यांनी ठाकरेंना बेस्ट सीएम म्हणून मिळणाऱ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा खिताब कर्जतच्या फार्म हाऊसवर बसून केला होता का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. ठाकरेंच्या अडीचवर्षांच्या काळात महाराष्ट्र देशोधडीला लागून पिछाडीवर गेला. असे असताना राऊतांच्या मालकाला म्हणजेच ठाकरेंना बेस्ट सीएमचा पुरस्कार मिळत होता. हा सर्व्हे कर्जतच्या फार्म हाऊसवर की डिनू मोरियाच्या घरी होत होता असे म्हणत याची माहिती जरा आम्हालाही द्या. दुसऱ्यांचा सर्व्हे आला की राऊतांच्या बुडाला चांगलीच आग लागते असेही राणे यावेळी म्हणाले.

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र बॉलिवूडमधील कलाकारांना स्वतःचा दिंडोरा पिटवण्यासाठी किती पैसे द्यायचे याची माहिती आम्ही देऊ का? असे म्हणत राणेंनी राऊतांच्या मर्मावर बोट ठेवले. आमचे सरकार अतिशय मजबूतरपणे काम करत असून, गतिमानपणे काम करत असल्यानेच अशाप्रकारचे सर्व्हे समोर येत असल्याचे राणे म्हणाले. त्यामुळे जेवढ्या लवकर हे सर्व्हे पचवले जातील तेवढे राऊतांचे पोट लवकर साफ होईल असा खोचक सल्लादेखील राणेंनी यावेळी मारला.

Tags

follow us