Download App

Eknath Shinde : सावरकरांचे ‘हिंदुत्व’ बाळासाहेबांना प्राणाहून प्रिय… मुलगा मात्र अपमान सहन करतो!

Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय होते. मात्र, त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी हे वारंवार आपमान करत आहेत. म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना ‘सावरकर गौरव’ यात्रा काढून मुहतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मी सावरकर’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, गायिका उषा मंगेशकर, श्रीधर फडके, सावरकर यांचे नातू रणजित सावरकर उपस्थित होते.

Uddhav Thackeray वैफल्यग्रस्त : आम्हीही त्यांना उद्धट, उद्धवस्त ठाकरे म्हणू शकतो… – Letsupp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकर यांच्या बालपणीची गोष्ट मी वाचत होतो. त्यांची आई देवपूजेला बसल्यानंतर त्यावेळी सावरकर हे अगरबत्तीचा धूर हातात पकडण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा त्यांच्या मातोश्री सांगायच्या अगरबत्तीचा धूर तुझ्या हातात सापडणार नाही. पण या अगरबत्तीचा सुगंध तुझ्या हातात राहिल. त्यामुळे आपण सावरकर समजून घेणं किती अवगड आहे, हे लक्षात येते. पण सावरकर समजून घेण्याचा प्रयत्न केल्यासम हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तीर आणि सावरकर म्हणजे तलवार अशा शब्दांत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काढले आहेत.

Tags

follow us