मुंबई : ज्यावेळी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा वाद सुरु होता, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाचे मुख्य नेते असे संबोधले जायचे. आता शिवसेना त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना पक्ष प्रमुख असे संबोधले जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली.
ज्या प्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेनेची रचना केली होती, त्या प्रकारची रचना भविष्यात शिवसेनेची असणार आहे. आत्ता शिवसेनेची निवड कमी प्रमाणात आहे. राष्ट्रीय कार्यकारणीनंतर निवड प्रक्रिया वाढवली जाईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Anushka Motion Pictures : ‘कालसर्प’चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान
काही दिवसांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आले आहे. निवडणुकीच्या अगोदर होणारे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे कोणताही पक्ष त्यांच्या राज्य कार्यकारणीला आणि राष्ट्रीय कार्यकारणीला काय वाटतं? याचा आढावा घेत असतो. पक्ष संघटनेत कोणत्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत? पक्ष विस्तारासाठी काय केलं पाहिजे? याची चर्चा केली जाते. यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे, असे स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसेनेची पहिली कार्यकारणीची बैठक होत आहे. त्यामुळे त्या कार्यकारणी बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.