Mumbai Corona Update : कोरोना (Corona) व्हायरसने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नव्या व्हेरियंटमुळं ( JN.1 variant) गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अमेरिका, सिंगापूर, चीन यांसारख्या देशांनंतर आता भारतातही जेएन 1 व्हेरियंटने शिरकाव केला. देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्यानंतर काल सिंधुदुर्गमध्येही JN.1 चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळं राज्यातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, मुंबईतही सावधगिरी बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘शरद पवारांमध्ये आशावाद हा नैसर्गिक गुण’; निलंबनाच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
आतापर्यंत राज्यात JN.1 प्रकाराचा एकच रुग्ण आढळून आला आहे. या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम करण्यासाठी सूचना केल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी या नव्या व्हेरियंटविषयी माहिती देतांना सांगितले की, JN.1 व्हेरियटं हा ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट आढळून आला. मात्र हा व्हेरियंट सौम्य आहे. त्यामुळं नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. मुंबईत पालिका प्रशासनाने या आजाराविरोधात लढण्यासाठी सर्व तयारी केली आहे. या तयारीचा काल पालिका आयुक्तांनी देखील आढावा घेतला आहे. रुग्णालयांमध्ये खाटा, औषध सगळं किती आहे? याचा आढावा घेतला आहे, असं शाह यांनी सांगितलं.
Video : सामान्य तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास चंद्रकांतदादांचा नकार; दिले चौकशीचे आदेश
शाह म्हणाल्या, सध्या भारत सरकारकडून जे निर्देश आले आहेत, तसंच काम केलं जाईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा वाढवायच्या आहेत. चाचण्या करून नव्या व्हेरियंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. हा आजार सौम्य असल्यानं भीती बाळगण्याची गरज नाही, असं शाह म्हणाल्या.
मास्क सक्ती नाही
मास्क सक्ती करणार का? असं विचारलं असता शाह म्हणाल्या, हा व्हेरियंट सौम्य आहे. त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, काळीज घेणं गरजेचं आहे. स्वच्छतेचे पालन करायचे आहे. सर्दी, खोकला, ताप असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. मास्क घालण्याबाबत सध्या सक्ती नाही. मात्र, काळजी म्हणून नागरिक स्वतः इच्छेने मास्क वापरू शकतात. ज्यांना लक्षण जाणवतात त्यांनी या दुर्लक्ष करू नये. खोकला, सर्दी ही लक्षण असल्यासं जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन शाह यांनी केलं.
सध्या मुंबईत नव्या व्हेरियंटचे रुग्ण नाहीत. मात्र, सध्या 17 सक्रीय रुग्ण आहेत, असंही त्यांनी सांगितलं.