‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण; सोशल मीडियावर अधिकृत माहिती

‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण; सोशल मीडियावर अधिकृत माहिती

PHIR AAYI HASEEN DILRUBA : आनंद एल. राय निर्मित ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ (PHIR AAYI HASEEN DILRUBA Movie) चित्रपटाची शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता हा चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात दाखल झाला आहे. त्यामुळे कलर येलो प्रोडक्शनचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे.

कतरिना आणि विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमसचा’ ट्रेलर रिलीज, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

कलर येलो प्रॉडक्शनने आजतागायत अनेक चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना दिली आहे. आत्तापर्यंत “तनु वेड्स मनू, रांझना, गुड लक जेरी आणि तुंबाड यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची पर्वणी त्यांनी प्रेक्षकांना दिली. कलर येलो प्रोडक्शनचा आगामी प्रोजेक्ट “फिर आयी हसीन दिलरुबा” लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येण्याची शक्यता आहे.

नागरिकांनो गरम कपडे घाला! गारठा वाढला; नाताळानंतर आणखीन हुडहुडी वाढण्याची शक्यता

निर्माते आनंद एल. राय यांच्या घरी चित्रपटाच्या यशस्वीततेचं खास रॅप-अप सेलिब्रेशन झालं आहे. यावेळी अनेक कलाकार, मित्रमंडळी उपस्थित होते. हसीन दिलरुबा हा OTT मनोरंजनाच्या क्षेत्रात एक ट्रेलब्लेझर ठरला आहे. सर्वाधिक पाहिलेला चित्रपट म्हणून सलग अनेक आठवडे आपला दबदबा कायम ठेवत त्याने आपल स्थान निर्माण केलं आहे.

गिल-बिश्नोईची बादशाहत संपली, ‘हे’ खेळाडू बनले आयसीसी क्रमवारीत नंबर वन

आनंद राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन ने OTT वर आपल्या कामाची जादू कायम दाखवली असून 2024 मध्ये Netflix वर ‘फिर आयी हसीन दिलरुबा’च्या OTT रिलीजच्या घोषणेने या प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसने आणखीन एक वेगळी उंची गाठली आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ व्यतिरिक्त, कलर यलो प्रॉडक्शन ‘तेरे इश्क में’ आणि ‘नखरेवाली’ असे अनेक रोमांचक प्रोजेक्ट करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube