गिल-बिश्नोईची बादशाहत संपली, ‘हे’ खेळाडू बनले आयसीसी क्रमवारीत नंबर वन

गिल-बिश्नोईची बादशाहत संपली, ‘हे’ खेळाडू बनले आयसीसी क्रमवारीत नंबर वन

ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केल्यापासून भारतीय फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) जबरदस्त लयीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला होता. मात्र आता पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Aazam) पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबरने शुभमन गिलचा नंबर वनचा मुकुट हिसकावून घेतला आहे.

याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईचाही (Ravi Bishnoi) नंबर वन गेला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आसीसीने आज नवीन क्रमवारी जाहीर केली. याममध्ये गिल आणि विश्नोईला मोठा धक्का बसला आहे.

बाबरने 824 रेटिंग मिळवून एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. गिल 810 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला आदिल रशीदने मागे टाकले. इंग्लिश फिरकीपटू रशीदने 715 रेटिंग मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार, ‘या’ 2 खेळाडूंना खेलरत्न

अफगाणिस्तानचा राशिद खान 692 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. रवी बिश्नोई 685 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या यादीतील टॉप-5 वर नजर टाकली तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 679 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि महिश तीक्षाना 677 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान

कोहली तिसऱ्या, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर
एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली 775 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मा 754 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित आणि कोहली यांनी फलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 745 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube