साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान

साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान

मुंबई : मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रिंगाण  कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. 12 मार्च 2024 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. (Sahitya Akademi award in Marathi language has been announced for Krishnat Khot’s novel ‘Ringan’)

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुरस्कारांसाठी निवडलेल्या कलाकृतींला आणि साहित्याला मंजुरी दिली. यानंतर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी आज (20 डिसेंबर) रवींद्र भवन येथील साहित्य अकादमी भवनात या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची घोषणा केली. यावर्षी 24 भारतीय भाषांमधील नऊ काव्यसंग्रह, सहा कादंबर्‍या, पाच कथासंग्रह, तीन निबंध आणि एक समीक्षेच्या पुस्तकांची पुरस्कारांसाठी निवड झाल्याची माहिती दिली.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार, ‘या’ 2 खेळाडूंना खेलरत्न

यात ज्येष्ठ हिंदी कथाकार संजीव यांच्या ‘मुझे पहचानो’ या कादंबरीची यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याशिवाय अरुण रंजन मिश्रा यांच्या संस्कृतमधील शुन्ये मेघगनम या काव्यसंग्रहाची, सादिका नवाब सहर यांची उर्दू भाषेतील राजदेवची अमराई या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. याशिवाय डोगरी भाषेसाठी विजय वर्मा, गुजराती भाषेसाठी विनोद जोशी, काश्मिरी भाषेसाठी मनशूर बनिहाली, मणिपुरी भाषेसाठी सोरोखाईबाम गंभीरी, ओरिया भाषेसाठी आशुतोष परिदा, पंजाबी भाषेसाठी स्वर्णजीत सावी, राजस्थानी गजेसिंग राजपुरोहित यांच्या साहित्यीची निवड करण्यात आली आहे.

Inside Story : केजरीवाल-ठाकरेंनी फिरवली सूत्र, ममतांचा प्रस्ताव अन् PM रेसमध्ये ‘खर्गेंची एन्ट्री’

साहित्य अकादमी पुरस्कार का दिला जातो?

साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारशाचे संवर्धन आणि जतन व्हावे हा या मागाली उद्देश असतो. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube