नागरिकांनो गरम कपडे घाला! गारठा वाढला; नाताळानंतर आणखीन हुडहुडी वाढण्याची शक्यता

नागरिकांनो गरम कपडे घाला! गारठा वाढला; नाताळानंतर आणखीन हुडहुडी वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather : देशभरासह राज्यात आता चांगलाच गारवा सुटणार असल्याची परिस्थिती आहे. कारण सोमवारपासून राज्यातील (Maharashtra Weather) अनेक भागात थंडी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील मुंबईसह, पुणे ठाणे, विदर्भात नागरिकांच्या अंगावर गरम कपड्यांची चादर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर शेकोट्या पेटवून नागरिक ऊब घेताना दिसताहेत. नाताळाच्या सुमारास तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठा आंदोलकांना दिलासा, आंदोलकांवरील 324 खटले मागे घेतले, फडणवीसांची माहिती

राज्यातील विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान घसरल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 12 अंशाखाली गेल्याचं सांगण्यात येत आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तर किमान तापमान घसरलं आहे. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीला सामोरं जावं लागत आहेत. थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिकांकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT

विशेषत: हिंगोली जिल्ह्यात तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस इतक्या प्रमाणात घटल्यामुळे जिल्ह्यात सर्व दूर थंडीची लाट पाहायला मिळत आहे. या काळात अनेक नागरिक जेथे सकाळी मॉर्निंग वॉक करताना आणि धावताना पाहायला मिळत आहेत.

भाजप आमदाराची मागणी, जयंत पाटलांचे आव्हान अन् फडणवीसांनी केली मोठी घोषणा

विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून मागील आठवड्यात मुंबईचं तापमान 20 अंशाच्या खाली गेलं होतं. आता मुंबईच्या तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली असून नाताळानंतर मुंबईसह उपनगरात तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Jhimma 2 Box Office: 2023 वर्षात निर्माते आनंद एल यांच्या ‘झिम्मा 2’ची दमदार कमाई!

दरम्यान, मुंबईतील IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले असून कुलाबाच्या हवामान विभागात किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंद झालीयं. 12 डिसेंबरला यंदाच्या वर्षीची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती.12 डिसेंबरला ही नोंद 19.4 अंश इतकी होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube