पुणे – एस. जयशंकर लिखित The India Way (भारत मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात पार पडले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले हे पुस्तक थोडक्यात मी वाचलं आहे. या पुस्तकात सोप्या भाषेत परराष्ट्र धोरण मांडलं. यातील दिलेले संदर्भ महत्वाचे आहे. चौथाईवाले यांनी महाभारत आणि कृष्णाची उदाहरण आणि संदर्भ दिला तो महत्वाचा आहे. जशी महाभारतात नातेवाईक निवडण्याची मुभा नव्हती. तशी आपल्याला शेजारी निवडण्याची मुभा नाही.
https://youtu.be/5SQautKzxvI
भारत आज आपल्या शाश्वत विचारावर उभा आहे. मोदी आले तेव्हापासून कुणाच्याही दबावाखाली धोरण नाही. याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. आपल्यावरील ओझं यामध्ये आहेत. फाळणी, आर्थिक सुधारणा, आण्विक धोरणासाठी झालेला विलंब हे यामुळे मांडलं. असे फडणवीसांनी सांगितले…
चीनने कशी प्रगती केली आणि आपण कुठे कमी पडलो यावर देखील मांडणी केली आहे. तसेच भविष्यात काय परिणाम होईल हे देखील त्यांनी मांडलं आहे. भारत आज जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा आहे. आज रशिया आणि अमेरिका यांच्याकडे न जाता भारताच्या बाजूने उभे आहेत. यामुळे आपल्या परराष्ट्र धोरनाने काय मिळवलं हे लक्षात येते. मी पूर्ण पुस्तक वाचणार आहे. हे पुस्तक भाजपच्या आमदारांपर्यंत पोचवण्याचं काम केले जाईल. असे देखील यावेळी ते म्हणाले.