Download App

तुमच्या अनागोंदी कारभाराच्या फायली तयार; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना इशारा

Aditya Thackeray : मुंबई महापालिकेतील अनागोदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज धडक मोर्चा काढण्यात आला. पाऊस असूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चासाठी जमले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) इशारा दिला आहे. तुमच्या फाईल्स तयार केल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला तुमची जागा दाखवू असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. ( files of your chaotic affairs is ready Aditya Thackeray warns CM Shinde over from BMC Corruption)

या मोर्चाला संबोधित करतांना आदित्य ठाकरेंननी घोटाळ्यांचा पाढा वाचला. ते म्हणाले, पहिला घोटाळा रस्त्याचा घोटाळा होता. तो सगळ्यांना कळायला हवा. कारण तुमच्या आमच्या पैशाचा दुरुपयोग केला आहे. मला विचारलं की, तुम्ही निवेदन देणार आहात का? मी म्हणालो चोरांनी काय निवेदन द्यायचं. तुम्ही जी काही चोरी केली ती आता आमच्या नजरेत आली. तुमच्या फाईल्स तयार झाल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलिस येऊन तुमची जागा तुम्हाला दाखवू. पुढील फाईलवर सही करताना लक्षात ठेवा. दिल्लीतून कितीही आदेश आले तरी मुंबई लुटू नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण कसं देणार तेही सांगा; आरक्षणावर संभाजीराजेंचा सवाल 

ते म्हणाले, पाच कंत्राटदारांनी पाच पाकिटे बनवली. ही रस्त्याचे काम पाच कंत्राटदारांना वाटण्यात आले. ऑगस्टमध्ये पहिल्यांदाच पाच हजार कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. परंतु, एकाही मित्राने कंत्राट न भरल्यानं ते रद्द करण्यात आलं. नंतर एक हजार वाढवून सहा हजार कोटांना कंत्राट नेण्यात आलं. यावेळी कंत्राटदारांना 40 टक्के लाभ देण्यात आला. पहिल्यांदाच रस्त्याच्या कंत्राटदाराला 18 टक्के वाढ देण्यात आली,’ असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबई काबीज करण्यासाठी सरकारकडून माजी नगरसेवकांना फोडले जात आहे. यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. माझ्याकडे याच्या काही रेकॉर्डिंग आहेत. मी लवकरच ते उघड करेन. असा खळबळजनक आरोप करत मुंबई महापालिकेवर भगवाच फडकणारच, असा संकल्प आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Tags

follow us