मराठा समाजाला आरक्षण कसं देणार तेही सांगा; आरक्षणावर संभाजीराजेंचा सवाल

मराठा समाजाला आरक्षण कसं देणार तेही सांगा; आरक्षणावर संभाजीराजेंचा सवाल

Sambhajiraje Chatrapati : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला (Maratha Reservation) जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या भावना चांगल्या आहेत. पण यातून आता मार्ग काढायला हवा. मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे स्पष्ट करायला हवं. तसेच कशा पद्धतीने आरक्षण देता येईल हे देखील स्पष्ट करायला हवे.

‘पंकजाताई, तुमच्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका’; ‘सकल मराठा’ च्या नेत्याचे प्रत्युत्तर

तेलंगाणातील भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील पक्ष विस्तारावरही त्यांनी भाष्य केले. लोकशाहीमध्ये सगळ्यांना ताकद दाखविण्याचा अधिकार आहे. आम्हाला देखावा आवडत नाही आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. शक्तीप्रदर्शन हा त्यांचा (बीआरएस) पॅटर्न असेल, असे संभाजीराजे म्हणाले.

पंकजाताई मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका – पवार

याआधी सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार यांनी मात्र मुंडेंना चांगलेच सुनावले होते. कजाताई तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुमंच खरंच मराठा समाजावर प्रेम असेल तर मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातून पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी तुम्ही करा. हा सकल मराठा समाज तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, अशा शब्दांत पवार यांनी मुंडे यांना प्रत्युत्तर दिले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. बीडमध्येही मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चातही तुम्ही सहभागी नव्हता. आज मात्र फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी असे वक्तव्य करत आहात. असलं कोरडं प्रेम तुम्ही मराठा समाजावर दाखवू नका, असेही पवार यांनी सुनावले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube