मुंबई : ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळ्या कारणाने आव्हाड हे सातत्याने अडचणीत सापडत आहे. यातच आता अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावईला जीवे मारण्याची धमकी देणारी एक Audio क्लिप सध्या वायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांकडून ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांना मारहाण करण्यात आली. कथित ऑडिओमध्ये महेश आहेर यांनी बाबाजी नावाच्या शुटरला सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याला खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर दुजोरा दिला आहे.
आव्हाडांच्या सांगण्यावरूनच हल्ला झाला…
महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी हल्ला केला. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.
…तर हे लोकं सुपारी देऊन कोणालाही, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड बोलले
व्हायरल Audio क्लिप मध्ये नेमकं आहे तरी काय?
जितेंद्र आव्हाड यांच्या माझ्या मुलीला स्पेनमध्ये शुटर लावून शुट करून टाकायचे. आव्हाड यांचा जावई जर भेटला नाही तर त्यांच्या घराजवळ काहीतरी गोंधळ घालायचा म्हणजे ते आईवडीलांना भेटायला येतील. असे बरेच काही त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे, असा दावा केला जातोय.