…तर हे लोकं सुपारी देऊन कोणालाही, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड बोलले
ठाणे : दररोजची 20 लाख रुपये यांची कमाई होत असेल तर हे लोकं 10 लाख रुपये देऊन कोणालाही उडवतील, अशी शक्यता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलीय. आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आव्हाड म्हणाले, कालची जी धमकी आली त्यावर माझ्या मित्राला सांगितलं की, तेरे साहब को ठोक दुंगा… माझ्या मित्राने मला सांगितल्यानंतर मी तत्काळ ट्विट केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच माझ्या हितचिंतकांनी हा ऑडिओ माझ्याकडे आणल्याचं त्यांनी सांगितलं.
ICC Ranking : महिन्याभरात आयसीसीकडून झाली दुसऱ्यांदा चूक
या कथित ऑडिओमध्ये अनेक धक्कादायक बाब असून महापालिकेचा आयुक्त मी शूटर लावणार असल्याचं म्हणत आहे. त्यासोबतच हा आयुक्त दररोज 40 लाख आणतो, आणि 20 लाख वाटतो, म्हणजे ही महापालिका आहे की, कुबेरचा खजिना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Chandrakant Patil : ‘देवेंद्र फडणवीस हे अतिशय धूर्त राजकारणी’
ऑडिओ क्लिपमध्ये असणारा हा बाबाजी म्हणजे सुभाषसिंग ठाकूर आहे, तो मुंबईतला मोठा गॅंगस्टार आहे. जे.जे. हत्याकांडात तो असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी म्हटंलय. त्याने एकदा आमच्या नगरसेवकाला घाटकोपला नेऊन दम दिल्याचंही त्यांनी सांगितलंय.
बाळासाहेब थोरात-नाना पटोले एकाच व्यासपीठावर; चहाच्या पेल्यातील वादळ शमलं ?
अनेकांचा खास असलेला हा आयुक्त त्याच्या ताब्यात अनेक वर्षांपासून पालिकेची इस्टेट आहे. त्याने म्हाडामध्ये शंभर फ्लॅट सह्या करुन वेगवेगळ्या माणसांनी दिले असल्याचाही आरोप आव्हाडांकडून करण्यात आला आहे. त्याने काय काय बेकायदेशीर कामे केली आहेत ते चौकशीत समोर येईलच, असंही त्यांनी म्हटंलय.
सहाय्यक आयुक्ताचं प्रमाणपत्र खोटं :
महेश आहेर यांनी सिक्कीममधील एका कॉलेजमध्ये पदवी मिळवल्याचं सांगण्यात येतंय. पण त्याच्या पदवीचं प्रमाणपत्र खोटं आहे. तो कधीच सिक्कीमला शिकण्यासाठी गेलेला नाही. तसेच आहेर याच बारावीच प्रमाणपत्रही खोट असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. पालिकेत फक्त आयुक्तच होता येत नाही बाकी सगळं होता येतं असा आरोपही त्यांनी महापालिका प्रशासनावर केला आहे.
Shinde Vs Thackeray : शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी काय युक्तिवाद केला? दिवसभरात काय घडलं?
दरम्यान, या प्रकरणी मी पोलिसांत तक्रार करणार नसून माझ्या कुटुंबियांची सुरक्षा करण्यासाठी मी सक्षम असल्याचं स्पष्ट केलं असून पोलिसांनी मात्र बाबाजी कोण आहे त्याचा तपास करावा कारण त्याच्यापासून पोलिसांनाही धोका असल्याचं ते म्हणालेत. माझ्याविरोधात खोटा 354 दाखल केला जातो, त्यामुळे माझा प्रशासन आणि सरकारवरचा विश्वास उडाला असल्याचं स्पष्ट केलंय.
धमकीच्या प्रकरणानंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली असून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आहेर यांना झालेल्या मारहाणीबाबत मला माहित नसल्याचं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलं आहे.