Download App

‘माझ्यासाठी निर्णय घेणं सोपं नव्हतं पण’.. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत देवरांनी सांगितली ‘अंदर की बात’

Milind Deora Joins Eknath Shinde Shivsena : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत न्याय यात्रेला मणिपुरातून सुरुवात झाली आहे. नेमक्या याच दिवसाचे टायमिंग साधत देवरांनी काँग्रेसला धक्का दिला. मिलिंद देवरा यांच्याबरोबर दहा माजी नगरसेवकांनाही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन किर्तीकर, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. प्रवेशानंतर देवरांनी मनोगत व्यक्त करत काँग्रेस सोडण्याचे कारणही सांगितले. तस तसेच त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेची मदत घेतल्यानंतरच मुरली देवरांचेही राजकारण ‘सेट’ झाले होते 

देवरा म्हणाले, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांचे मला फोन आले. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेताय असे विचारले. खरंतर माझ्या वडिलांच्या वेळची काँग्रेस आणि आताची काँग्रेस या दोन्ही काँग्रेसमध्ये मोठा फरक आहे. मी कधी काँग्रेस सोडेन असं मला वाटलं नव्हतं.पण, आज मी काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिले आहे. मुख्यमंत्री शिंदे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरही देवरा यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार असताना जर काँग्रेस आणि ठाकरे गटाने चांगलं काम केलं असतं तर आज एकनाथ शिंदे आणि मला येथे बसावं लागलं नसतं. प्रत्येक वेळी विरोधात बोलणेही योग्य नाही. उद्या जर पंतप्रधान मोदी जर म्हणाले, काँग्रेस चांगली पार्टी आहे. तर हे लोक त्यालाही विरोध करतील असे देवरा म्हणाले. काँग्रेस सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. परंतु, आता निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे देवरा यावेळी म्हणाले.

मिलिंद देवरांनी केलेली जखम राहुल गांधी कधीच विसरू शकणार नाहीत..

मी डॉक्टर नाही, पण मोठं ऑपेरशन केलं – एकनाथ शिंदे 

एकनाथ शिंदे म्हणाले, धाडसी निर्णय वेळेनुसार घ्यावे लागतात. मी देखील दीड वर्षांपूर्वी असाच निर्णय घेतला होता. मी निर्णय घेतांना श्रीकांतच्या आईला विचारून चर्चा करून घेतला. मी डॉक्टर नाही पण मोठं ऑपरेशन नक्कीच केले. काँग्रेससोबत तुम्ही बराच काळ काम केले आहे मी पण सेनेत काम करत आहे आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्ही (मिलिंद देवरा) वयाच्या २७व्या वर्षी खासदार झालात उच्चशिक्षित आहात. काळानुरूप बदल होतात एक अभ्यासू आहात त्याचा देशाला गरज आहे.

राज्यातील जनता सुज्ञ आहे, काही लोकं काल कल्याणला बोललेत आता निवडणुकांमध्ये साफ करायचे आहे. त्यांना मला सांगायचे आहे रस्ते धुणारे आणि रस्ते साफ करणाऱ्यांना कोणाची साथ आहे. प्रत्येक पावसात रस्ते खराब होतात तरी कसे आजवर किती पैसे खर्च झाले तर अधिकारी म्हणालेत साडेचार हजार कोटी फक्त दुरुस्तीवर खर्च झालेत. मग मी निर्णय घेतला आता सिमेंटचेच रस्ते बनतील. देवराजी तुमच्या सारखे व्हिजनरी लोक आमच्या सोबत येतील तेव्हा मुंबईत आणखी उद्योग नक्कीच येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

follow us