Download App

राऊतांच्या गडाला CM शिंदेंचा सुरुंग; अत्यंत विश्वासू सहकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का दिला आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या गडाला सुरुंग लावत शिंदेंची महत्वाच्या शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश करवून घेतला आहे. राऊत बंधूंचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे विक्रोळीचे (कन्नमवार नगर) माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी सरपंच यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Former Vikhroli (Kannamwar Nagar) corporator Upendra Sawant, a staunch confidant of Sanjay Raut and Sunil Raut, has joined the Shiv Sena.)

‘इंडिया’चे नेते नाष्टा अन् जेवणावर मारणार आडवा हात; मेन्यू पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

यावेळी बोलताना सावंत म्हणाले, मागील दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या भागाचा विकास करता येणे शक्य होत नसेल तर कसे चालणार? असे म्हणत आपल्या प्रभागातील विकासकामांना गती मिळावी यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सावंत यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या 33 झाली असून त्यातील 25 हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आहेत.

Mumbai : पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मुलींनीच आईला दिला खांदा…

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, निवडणूक घेण्याची हिंमत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र ठाकरे गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे. उलट शिवसेनेची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी असून कधीही निवडणुका लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एनडीएला हरवणं अशक्य :

विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करताना शिंदे म्हणाले, काहीही करून नरेंद्र मोदी यांना हरवणे एवढाच या आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. मात्र यापूर्वी विरोधकांनी एकत्र येऊन 2014 आणि 2019 साली आघाडी केली होती. तरीही त्यांना नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बसलेले आपल्याला दिसतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Tags

follow us