‘इंडिया’चे नेते नाष्टा अन् जेवणावर मारणार आडवा हात; मेन्यू पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

  • Written By: Published:
‘इंडिया’चे नेते नाष्टा अन् जेवणावर मारणार आडवा हात; मेन्यू पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

मुंबई :  देशातून ‘मोदी राज’ उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत उद्या (दि.31) आणि परवा म्हणजेच (दि.1) रोजी पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावणार असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात आली आहे. पाहुणचारासाठी अनेक मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल या बैठकीत असणार असून, नेमका दोन दिवसांच्या दौऱ्यात काय काय पदार्थ सर्व्ह केले जाणार आहेत ते आपण पाहू. (Opposiation Party Meeting In Mumbai )

अजितदादांची एन्ट्री, वळसे पाटलांना खास मान : CM शिंदे-फडणवीसांकडून विखे पाटलांना नारळ

नाश्त्यात काय असणार

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या नेते मंडळींसाठी नाश्त्यात वडा पाव, बाकरवडी, नारळाची वडी, नाचणीचे वेफर्स, नारळ पाणी, लिंबूपाणी, फळांचा ज्यूस यांच्या अन्य पदार्थांचा यात समावेश करण्यात आला आहे.

तर, दुपारच्या जेवणाच्या मेन्युत गरमागरम भाकरी, झुणका, काळ्या वाटाण्याची उसळ, वालाची उसळ, हिरव्या, लाल मिर्च्यांचा ठेचा, मसाले भात त्याच बरोबर कोल्हापुरी पांढरा रस्सा, मालवणी प्रॉन्स करी, वेगवेगळे सूप आणि सलाड या पदार्थांचा समावेश असणार आहे.

कॉल सेंटर मोहीम अन् मिशन 350 प्लस; 2024 साठी भाजपचा ‘मायक्रो प्लॅन’

स्वीट डिशमध्ये काय असणार

वरील पदार्थांशिवाय मुंबईत बैठकीसाठी दाखल होणाऱ्या पाहुणेमंडळींसाठी स्वीट डिशमध्ये मराठमोळी पुरणपोळी, नारळाची करंजी, दुधी मावा, मोदक

नाशिक ढोलने होणार स्वागत

मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थिती दर्शविणार आहेत.

Wadhawan brothers : कैदेतही जगतायत अलिशान आयुष्य; IPS अमिताभ गुप्ता कनेक्शन पुन्हा समोर

या 80 नेत्यांसाठी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये 170 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. विमानतळावर राष्ट्रवादी-काँग्रेस सर्व नेत्यांचे स्वागत करतील, तर शिवसैनिक हॉटेलवरील व्यवस्थेवर लक्ष देणार आहेत. तुतारी आणि नाशिक ढोलताशाच्या गजरात विरोधकांचे स्वागत करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube