Download App

CM शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातून 24 तासात 6 अल्पवयीन मुले बेपत्ता : तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान!

ठाणे : नवी मुंबईतील विविध भागातून गेल्या 24 तासांत चार अल्पवयीन मुली आणि दोन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातूनच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Four minor girls and two boys have gone missing from various parts of Navi Mumbai in the last 24 hours)

याबाबत अधिक माहिती अशी की, 3 ते 4 डिसेंबर दरम्यान वयवर्षे 12 ते 15 या वयोगटातील सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. यापैकी, सोमवारी कोपरखैरणे येथून बेपत्ता झालेला 12 वर्षांचा मुलगा ठाणे रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. त्याला तातडीने ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. इतर मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

Mumbai : अजितदादांचा आयुक्तांना फोन, अधिकाऱ्यांना खडसावलं; नेमकं काय घडलं?

कुठून किती मुले बेपत्ता झाली?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंबोली भागातून 13 वर्षीय मुलगी रविवारी तिच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. पण ती परत आलीच नाही. तर पनवेल येथून 14 वर्षीय मुलगी रविवारी तिच्या मैत्रिणीच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमाला गेली होती. तीही घरी परतलीच नाही. कामोठे परिसरातून 12 वर्षीय मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली. याशिवाय 13 वर्षीय मुलगी सोमवारी शाळेसाठी रबाळे परिसरातील आपल्या घरातून निघाली होती, मात्र ती परतली नाही.

उद्धव ठाकरेंचा अदानी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारलाही थेट इशारा

सोमवारी पहाटे रबाळे भागातूनच 13 वर्षीय मुलगा सार्वजनिक शौचालयात गेला आणि तेव्हापासून तो गायब झाला. तर सोमवारी कोपरखैरणे येथून 12 वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. पण तो नंतर ठाणे रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. त्याला तातडीने ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, इतर बेपत्ता मुलांचा तपास सुरु असून या प्रकरणी सर्व संबंधित पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us